श्री. संजय भाटिया, उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
माननीय श्री. संजय भाटिया हे यांत्रिकी अभियंता असून त्यांनी ऑस्ट्रेलियातील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे. ते केंद्र शासनाच्या सचिव व राज्याच्या मुख्य सचिव दर्जाचे महाराष्ट्र संवर्गातील 1985 च्या बॅचचे भा.प्र.से. अधिकारी होते. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध वरिष्ठ स्तरावरील सेवेचा त्यांचा 35 वर्षांचा अनुभव आहे. जुलै 2020 मध्ये ते मुबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त झाले.
त्यानी अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे जसे की, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (नवीन शहरे, विमानतळ, मेट्रोचा विकास); आयुक्त, विक्रीकर, महाराष्ट्र; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी; महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सचिव; यशदाचे अतिरिक्त महानिदेशक; संचालक, अवजड उद्योग, भारत सरकार; जिल्हाधिकारी, गडचिरोली; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर आणि प्रांत अधिकारी, करवीर, जिल्हा कोल्हापूर इत्यादि आणि ध्यानधारणेच्या तंत्राच्या सहाय्याने ह्या सर्व संस्थामधील व्यवस्थापन व मानव संसाधन विकासामध्ये पारदर्शक सुधारणा घडविल्या आहेत. त्यांना भ्रष्टाचारविरोधात लढा देण्यासाठी “अनन्या” पुरस्कार, ई-गर्व्हनन्स पुरस्कार, राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार, महा शिल्पकार पुरस्कार, ब्लुमबर्ग पुरस्कार आणि भारतामधील क्रुझ पर्यटनाच्या विकासातील योगदानाबद्दल ट्रॅव्हलर टुडे पुरस्कार आदि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ते हार्टफुलनेस मेडिटेशनचे अभ्यासक आहेत आणि गेल्या वीस वर्षांपासून ध्यानाधारणेचा सराव करत आहे .त्यांची दि.28 ऑगस्ट, 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे उप लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.