बंद

    श्रीमती सुवर्णा किशोर केवले, न्यायिक सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य

    मा. श्रीमती सुवर्णा किशोर केवले ह्या महाराष्ट्र न्यायिक सेवेतील सेवानिवृत्त वरिष्ठ न्यायिक अधिकारी आहेत. त्यांनी एम.कॉम. एल.एल.बी. पदवी प्राप्त केली असून 1988 ते 2010 या कालावधीत वकील म्हणून काम केले आहे. वकिली व्यवसायातील 22 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय कामगिरीनंतर सन 2010 मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाली.

    आपल्या न्यायिक कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र न्यायव्यवस्थेत नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई व अहमदनगर येथे न्यायाधीश म्हणून तर जालना व अकोला येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत. त्यामध्ये विशेषतः महिला व बालकांवरील अत्याचार आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील अनेक खटल्यांचा समावेश आहे. त्यांनी मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात प्रधान सचिव तथा विधी परामर्शी (RLA) म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या प्रथम महिला ठरल्या आहेत. त्यांना न्यायिक प्रशासन, महत्वाचे न्यायनिर्णय, विधी शिक्षण आणि शासकीय विधी व्यवहार या क्षेत्रांतील व्यापक अनुभव आहे.

    त्यांची दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी न्यायिक सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाली आहे.